नाले सफाईच्या तक्रारीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाले सफाईच्या तक्रारीत वाढ
नाले सफाईच्या तक्रारीत वाढ

नाले सफाईच्या तक्रारीत वाढ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई. ता. ३ : नालेसफाईची कामे शंभर टक्के झाल्याचा दावा महापालिकेने केल्यानंतरही नालेसफाईच्या तक्रारीत वाढ झाली आहे. नालेसफाईबद्दल ४५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. मुंबईतील नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांबाबत तक्रार, सूचना करण्यासाठीची प्रक्रिया नागरिकांसाठी सुलभ व्हावी, तसेच या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने मुंबईकरांना ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांना आपल्या भागातील नाल्यातून गाळ काढण्याबाबतची तक्रार, सूचना ही व्हॉट्सॲप चॅटबॉट प्रणालीच्या माध्यमातून ९३२४५००६०० या क्रमांकावर नोंदवता येणार आहे. १ जूनपासून पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ही व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक सेवा कार्यरत आहे. दरम्यान आतापर्यंत ४५ तक्रारी दाखल झाल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.