
निवृत्त २० कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ
उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) : गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगर महापालिकेच्या सेवेत असणारे २० कर्मचारी ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी निवृत्त होण्याची पालिकेतील ही पहिलीच वेळ आहे. आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महासभेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सेवापूर्ती समारंभात या सर्व कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला आहे. आपल्या सहकारी कर्मचाऱ्याला निरोप देताना अनेक कर्मचारी भावुक झाले होते. अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर, उपआयुक्त अशोक नाईकवाडे, मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखा परीक्षक शरद देशमुख, प्रशासनाधिकारी अशोक मोरे, सहायक आयुक्त अच्युत सासे, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, दिव्यांग विभागप्रमुख राजेश घनघाव यांच्या उपस्थितीत या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू व बुके देऊन निरोप देण्यात आला.