निवासी डॉक्टरांचा संप मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवासी डॉक्टरांचा संप मागे
निवासी डॉक्टरांचा संप मागे

निवासी डॉक्टरांचा संप मागे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ४ : जे. जे. च्या निवासी डॉक्टरांनी प्रमुख चार मागण्यांसाठी केलेला संप यशस्वी झाला असून त्यांनी आता संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी सकाळी १० वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत थकबाकी आणि स्टायपेंडच्या विषयांतील मागण्या मान्य होण्याचे आश्वासन मिळाले असल्याचे निवासी डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी पुन्हा पूर्ण क्षमतेने कामावर रुजू होऊ, असे आश्वासन देत त्यांची सेवा कार्यरत केली आहे.

डॉ. लहाने यांच्यामुळे नेत्र विभागात निवासी डॉक्टरांना शस्त्रक्रिया शिकण्यात अडचणी येत असल्याची तक्रार निवासी डॉक्टरांनी केली होती. त्यामुळे डॉ. लहाने यांच्यासह आठ डॉक्टरांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली गेली होती. दरम्यान, सर्वांचे राजीनामे मंजूर झाले असून इतर मागण्या मान्य झाल्याने राज्यभर संप न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सांगितले.
दरम्यान, थकबाकी, सहाय्यक आणि असोसिएट प्राध्यापकांच्या पद भरतीच्या विषयावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सचिवालयाला दिले आहेत, अशी माहिती मध्यवर्ती मार्डचे अध्यक्ष अभिजीत हेलगे यांनी दिली.
---
निवासी डॉक्टरांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत; तर काही मागण्या मान्य करण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी राज्यव्यापी आंदोलन मागे घेण्याबाबत पत्र दिले आहे. त्यानुसार आम्ही विभागांना माहिती देणार आहोत.
- डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जेजे रुग्णालय