Sun, Sept 24, 2023

ठाण्यातील फरार आरोपीला कासा येथून अटक
ठाण्यातील फरार आरोपीला कासा येथून अटक
Published on : 4 June 2023, 12:57 pm
कासा, ता. ४ (बातमीदार) : विविध गुन्ह्यांत अटक असलेला आरोपी गेल्या पंधरा दिवसांपासून ठाणे पोलिसांच्या तावडीतून फरार झाला होता. त्याला कासा पोलिस ठाणे हद्दीतील निंबापूर जंगलातून अटक करण्यात आली आहे. कासार वडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला आरोपी विशाल संतोष रेड्डी (वय २३, रा. ठाणे) हा १७ मे रोजी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला होता. आरोपी हा गेल्या १५ दिवसांपासून कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निंबापूर गावाजवळील गिंबल पाडा येथील जंगलात ओळखीच्या व्यक्तिकडे लपून बसला होता. आरोपी हा जंगलात लपून बसल्याचे जनसंवाद मोहिमेच्या कार्यक्रमात सहभागी नागरिकांनी कासा पोलिसांना सांगितले. त्यानंतर कासा पोलिस व कासार वडवली पोलिस यांनी एकत्र मोहीम आखून आरोपीला ताब्यात घेतले.