डेव्हिड ससून ग्रंथालयाला नवी झळाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेव्हिड ससून ग्रंथालयाला नवी झळाळी
डेव्हिड ससून ग्रंथालयाला नवी झळाळी

डेव्हिड ससून ग्रंथालयाला नवी झळाळी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : सुमारे दीडशे वर्षांचा इतिहास आणि दुर्मिळ ग्रंथसंपदा असलेल्या जगातील ४८ हेरिटेज ग्रंथालयांपैकी एक असलेल्या मुंबईतील डेव्हिड ससून ग्रंथालयाचा वास्तूच्या जीर्णोद्वाराचे काम सुमारे १६ महिन्यांनंतर पूर्ण झाले आहे. आठवडाभरात किरकोळ कामे पूर्ण करून हे ग्रंथालय वाचकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती ग्रंथालय प्रशासनाने ‘सकाळ’ला दिली.
काळा घोडा परिसरात १८७० मध्ये डेव्हिड ससून ग्रंथालयाची इमारत बांधण्यात आली. ग्रंथालयाच्या इमारतीचा आराखडा स्कॉट मॅकलॅड अ‍ॅण्ड कंपनीने तयार केला, तर वास्तुकलेची रचना जे. कॅम्पबेल आणि गॉसलिंग अँड कॅम्पबेल यांनी केली. ही संपूर्ण इमारत गॉथिक शैलीमध्ये उभारण्यात आली आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी मालाड स्टोन आणि चुनखडीचा वापर करण्यात आला होता. या इमारतीच्या दर्शनी भागात जुन्या काळातील घड्याळ आहे. आजही या घड्याळाला दर सहा दिवसांनी चावी द्यावी लागते. ही हेरिटेज वास्तू पाहण्यासाठीही अनेक पर्यटक ग्रंथालयाला भेट देतात. २००६ मध्ये जगातील अप्रतिम ४७ ग्रंथालयांमध्ये डेव्हिड ससून ग्रंथालयाची नोंद झाली आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या जागतिक वारसा यादीत या इमारतीचा समावेश करण्यात आला आहे. या ऐतिहासिक ग्रंथालयाकडे पर्यटकांचा, पुस्तकप्रेमींचा आणि चित्रपट निर्मात्यांचा ओघ वाढावा, यासाठी काही सामाजिक संस्थांच्या मदतीने या इमारतीला नवी झळाळी देण्याचे काम १ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू करण्यात आले होते.
...
जीर्णोद्वाराचे काम पूर्ण
तब्बल सोळा महिन्यानंतर म्हणजे मे २०२३ मध्ये ग्रंथालयाचा वास्तूच्या जीर्णोद्वाराचे काम पूर्ण झाले आहे. सध्या ग्रंथालयातील किरकोळ कामे करण्यात येत आहेत. त्यानंतर ग्रंथालय वाचकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती डेव्हिड ससून ग्रंथालय प्रशासनाने दिली.