
श्री स्वामी समर्थांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा समग्र दर्शन सोहळा
श्री स्वामी समर्थांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा समग्र दर्शन सोहळा
जोगेश्वरी, ता. ५ (बातमीदार) ः श्री स्वामी समर्थांच्या विविध लीलांची छायाचित्रे आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्याची सुवर्णसंधी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील रहिवाशांबरोबरच मुंबईच्या विविध क्षेत्रातील श्री स्वामी भक्तांनी तीन ते चार जून दरम्यान घेतला. दत्ताराम गोविंद वायकर स्मृती ट्रस्ट संचलित इच्छापूर्ती गणेश मंदिरातर्फे प्रथमच श्री स्वामी समर्थांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा समग्र दर्शन सोहळा आयोजित केला होता. आमदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. या प्रदर्शनात १२५ हून अधिक दुर्मिळ छायाचित्रे, श्री स्वामींचे १४ फोटो, स्वामींचे अक्कलकोटचे अष्टविनायक या दर्शन सोहळ्यात ठेवण्यात आले होते. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रासह मुंबईच्या विविध भागांतील श्री स्वामी भक्तांना श्री स्वामींच्या लीलांची माहिती याची देही याची डोळा पाहता यावी, यासाठी दुर्मिळ छायाचित्रांच्या समग्र दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक अनिल म्हसकर यांनी दिली. या वेळी उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांनी या सोहळ्याला भेट देऊन असा कार्यक्रम राबवल्याने रवींद्र वायकर यांना धन्यवादही दिले.