मुलुंडच्या कामगार रुग्णालयाचा पुनर्विकास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडच्या कामगार रुग्णालयाचा पुनर्विकास
मुलुंडच्या कामगार रुग्णालयाचा पुनर्विकास

मुलुंडच्या कामगार रुग्णालयाचा पुनर्विकास

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुलुंड पश्चिमेकडील कामगार रुग्णालयाचा पुनर्विकास लवकरच होणार आहे. पाचशे खाटांच्या अद्ययावत सोयी-सुविधांसह पुनर्विकास होणाऱ्या कामगार रुग्णालयांत वैद्यकीय व नर्सिंग महाविद्यालय उभे राहणार आहे.

राज्य कामगार विमा योजना महामंडळाची मुंबईत विविध भागांत कामगार रुग्णालये आहेत. त्यापैकी मुलुंड पश्चिम परिसरात २१ एकरवर १८० खाटांचे रुग्णालय असून सध्या ते मोडकळीस आले आहे. त्या रुग्णालयाचा पुनर्विकास करण्याची मागणी अनेक महिन्यांपासून सुरू होती. त्यावर विचार झाल्यानंतर रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबत केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वांद्रे येथील ओएनजीसी कार्यालयात बैठक घेण्यात आली. केंद्र आणि राज्याच्या कामगार विभागाचे सचिव व अन्य अधिकारी बैठकीस उपस्थित होते. बैठकीत रुग्णालयाच्या उभारणीला मंत्री यादव यांनी मान्यता दिली.

लवकरच प्रशासकीय प्रक्रिया
कामगार रुग्णालय केंद्र सरकार उभारणार असून जमीन हस्तांतरणाबाबतचा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे. तीन वर्षांपासून रुग्णालयासंबंधी राज्य आणि केंद्रात पाठपुरावा सुरू होता. रुग्णालयासोबत तिथे वैद्यकीय व नर्सिंग महाविद्यालय बांधण्याची मागणी केली गेली होती. त्यालाही बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. प्रस्तावित रुग्णालयाचा आराखडा बनवून येत्या काही महिन्यांत प्रशासकीय प्रक्रिया सुरू होईल, असेही सांगण्यात आले आहे.