गोरेगाव उड्डाणपूल, मुलुंड खिंडीपाडाचे कंत्राट रद्द करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोरेगाव उड्डाणपूल, मुलुंड खिंडीपाडाचे कंत्राट रद्द करा
गोरेगाव उड्डाणपूल, मुलुंड खिंडीपाडाचे कंत्राट रद्द करा

गोरेगाव उड्डाणपूल, मुलुंड खिंडीपाडाचे कंत्राट रद्द करा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ५ : बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीवर उभारण्यात येणारा पूल कोसळल्याने या पुलाचे बांधकाम करणाऱ्या एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन कंपनीला गोरेगाव उड्डाणपूल, मुलुंड खिंडीपाडा व रत्नागिरी हॉटेल चौक येथील प्रकल्पांचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे हे कंत्राट रद्द करण्यात यावे आणि या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांना दिले आहे.

स्थायी समितीच्या २० डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या सभेतील विषय क्र. १० अन्वये रत्नागिरी हॉटेल चौक, गोरेगाव येथे प्रस्तावित ६ पदरी उड्डाण पूल, मुलुंड खिंडीपाडा येथे प्रस्तावित उच्चस्तरीय चक्रीय उन्नत मार्ग आणि डॉ. हेडगेवार चौक येथे ६ पदरी उड्डाणपूल आदी कामांचे मे. एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शनला ६६६,०६,७८,००० इतक्या रकमेचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. याच कंपनीतर्फे बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीवर उभारला जात असलेल्या पुलाचे चार ते पाच खांब रविवारी (ता. ४) पूल डिझाईन आणि तांत्रिक चुकीमुळे कोसळले. या कंपनीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे. तसेच कामामध्ये अनेक त्रुटीही आहेत.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा मुंबई शहरासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम सिंगला कन्स्ट्रक्शनने सुरू केले आहे. हे कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून त्यामुळे बिहारमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. यामुळे पालिकेने या कंपनीला कोणतेही काम देऊ नये व झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी, भविष्यात अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे होणारा धोका टाळण्यासाठी सिंगला कन्स्ट्रक्शनला दिलेले कंत्राट रद्द करून या कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी रवी राजा यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.