मुंबई-पुणे ई-वेवर वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी नविन ३७० कॅमेरे लागणार

मुंबई-पुणे ई-वेवर वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी नविन ३७० कॅमेरे लागणार

मुंबई-पुणे महामार्गावर सीसीटीव्हीची नजर
नवीन ३७० कॅमेरे लागणार; एचटीएमएस ऑगस्टपासून लागू करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वारंवार होणारे अपघात कमी करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ऑगस्टपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (एचटीएमएस) कार्यान्वित करणार आहे. या प्रणालीमध्ये ३७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे १७ प्रकारच्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर खासगी कंपनीद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. प्रत्येक चलनावर कंपनीला ५५५ रुपये दिले जाणार आहेत.
हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत एक नियंत्रण कक्षसुद्धा तयार करण्यात येणार आहे. लोणावळा खुसगाव येथे हा कक्ष असणार आहे. ज्या ठिकाणी वाहतूक पोलिस कर्मचारी आणि महामार्ग पोलिस सीसीटीव्ही फिडचे निरीक्षण करून, वाहतूक नियमांच्या गुन्ह्यांतर्गत चलान जारी करण्याचे काम करणार असल्याचे एमएसआरडीसीचे सहायक व्यवस्थापकीय संचालक संजय यादव म्हणाले आहेत.

खासगी भागीदारी तत्त्वावर प्रकल्प
सध्या एक्स्प्रेस वेवरील वेगावर लक्ष ठेवण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा नाही. परिवहन विभागांतर्गत स्पीड गन असलेली फक्त एक किंवा दोन वाहने तैनात केली जात आहेत. त्यामुळे एमएसआरडीसी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबणार आहे. त्यासाठी एमएसआरडीसीने एमएसआय प्रोटेक्स सोल्युशन कंपनीला या प्रकल्पाचे काम दिले आहे. ३४० कोटींचा हा प्रकल्प असून, १० वर्षांसाठी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

या प्रकरणांवर राहणार नजर
वेगाने वाहन चालवणे, रॅश ड्रायव्हिंग, लेन कटिंग अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर नजर ठेवली जाणार आहे. त्याशिवाय विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, सीटबेल्ट नसणे, वाहन चावताना फोनचा वापर, स्पीडचे उल्लंघन, टेल लाईट, रिफ्लेक्टर न वापरणे, फॅन्सी नंबर यांसह एकूण १७ प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांच्या उल्लघनांवर सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे.

कंट्रोल रूममधून कारवाई
सीसीटीव्हीसह चार सर्व्हिलन्स व्हॅनसुद्धा ठेवण्यात येणार आहेत. द्रुतगती महामार्गावर वेगाने वाहन चालवण्याची ३९ ठिकाणे शोधण्यात आली, तर लेन कटिंगची ३४ ठिकाणे शोधण्यात आली आहेत. वाहतूक नियम मोडणाऱ्या अशा वाहनांवर ई-चलानद्वारे कंट्रोल रूममधून कारवाई केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com