श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे व्यवस्थापकांची घेतली भेट!

श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे व्यवस्थापकांची घेतली भेट!

श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे व्यवस्थापकांची घेतली भेट
मुंबई, ता. ६ : विविध रेल्वे स्थानकांतील प्रश्न, पायाभूत सुविधा, रेल्वे गाड्यांचे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांच्यासमोर वाचला.
या वेळी गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे हे काम जलदगतीने करण्यात यावे, असे निर्देश त्‍यांनी दिले. तसेच दिवा स्थानकातून कोकणात जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांना दिवा येथे थांबा नाही. फलाटांची लांबी कमी असल्याने एक्स्प्रेस गाड्यांना थांबण्यास मोठी अडचण होते. त्यामुळे फलाटाचे लांबीकरण करण्यात यावे, असे मुद्दे खासदार शिंदे यांनी गोयल यांची भेट घेऊन मांडले. तसेच अमृत भारत स्थानकातील दिवा, मुंब्रा, डोंबिवली या स्थानकांचा विकास करण्यात यावा यासह दिवा-वसईदरम्यान धावणाऱ्या रेल्वेची संख्या वाढवण्यात यावी, ऐरोली-कळवा उन्नत मार्गिकेचे प्रकल्प याबाबत ही चर्चा करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com