नव्या शालेय हंगामाची तयारी जोमात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्या शालेय हंगामाची तयारी जोमात
नव्या शालेय हंगामाची तयारी जोमात

नव्या शालेय हंगामाची तयारी जोमात

sakal_logo
By

खारघर, ता. ६ (बातमीदार) : पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २४६ शाळा आहेत; तर तालुक्यात ८२ अनुदानित शाळा आहेत. या शाळेतील जवळपास पंचेचाळीस हजार विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठपुस्तके देण्याची तयारी शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या शालेय हंगामाची शिक्षण विभागाकडून जोमात तयारी केली जात आहे.
पनवेल तालुक्यातील गावे तसेच पाड्यांवर जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. गेल्या काही वर्षांत पालकांचा खासगी शाळांकडे कल वाढला आहे; मात्र या शाळांमध्ये प्रवेशाच्या नावाखाली घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक शुल्कामुळे तीन ते चार वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीसंख्येत वाढ झाली आहे. पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २४६ शाळा असून जवळपास २२ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; तर ८२ खासगी अनुदानित शाळा असून २३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे एकीकडे खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शालेय साहित्य खेरदीसाठी गर्दी होत असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या तसेच विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी नवी कोरी पुस्तके देण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून केले जात आहे.
-------------------------------------------
जुलैच्या पहिल्या आठवड्यात नवीन गणवेश
जिल्हा परिषद शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. बहुतांश पालक हे शाळा सुरू झाल्यावर प्रवेश घेत असतात. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे वयोगटानुसार गणवेश दिले जाणार आहेत. त्यानुसार जूनअखेर अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा संकल्प आहे. तसेच सरकारी व महापालिका तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या मुलांचे शाळेचे कपडे, शूज आणि सॉक्स हे शासनातर्फे मोफत दिले जाणार आहेत.
-------------------------------------
जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक दर्जा उंचावतील अशा पद्धतीने शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. त्यासाठी पनवेल परिसरातील जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळेत पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. काही पुस्तके प्राप्त झाली असून उर्वरित लवकरच प्राप्त होतील.
- सीताराम मोहिते, गट शिक्षणाधिकारी, पनवेल