स्वच्छता मोहिमेसाठी पालिकेचा रॅलीतून जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छता मोहिमेसाठी पालिकेचा रॅलीतून जागर
स्वच्छता मोहिमेसाठी पालिकेचा रॅलीतून जागर

स्वच्छता मोहिमेसाठी पालिकेचा रॅलीतून जागर

sakal_logo
By

वसई, ता. ६ (बातमीदार) : ‘मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर’ या अभियानांतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानगरपालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या वेळी सामाजिक संस्थांसह नागरिकांनी सहभाग घेतला होता. प्रभाग समिती ‘सी’ चंदनसार कार्यक्षेत्रातील जीवदानी रोड हिल पार्कपासून जीवदानी मंदिर पायथा परिसरात स्वच्छता मोहीम घेण्यात आली. स्वच्छता मोहिमेंतर्गत कचरा संकलन केंद्राबाबत महापालिका प्रशासनाकडून जनजागृती करण्यात आली. परिसरातील सर्व दुकानांत व गृहनिर्माण संस्थांमध्ये माहितीपत्रके वाटप करण्यात आली. रॅलीमध्ये लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, सहायक आयुक्त, उपअभियंता, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांच्यासह नागरिक व कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छता मोहिमेत १५ किलो प्लास्टिक व ११ किलो पुठ्ठा/ कागद जमा करण्यात आले.