पश्चिम उपनगर तुंबणार?

पश्चिम उपनगर तुंबणार?

पश्चिम उपनगर तुंबणार?
प्रशासनाच्या ३१ ठिकाणांवरील कामांचा फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः पश्चिम उपनगरांत ३१ ठिकाणी निरनिराळ्या उपाययोजना सुरू आहेत. ही कामे पुढील वर्षभरात पूर्ण होणार आहेत. त्‍यामुळे याचा फटका पावसाळ्यात बसणार असण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत असून यंदा कुठलाही दिलासा उपनगराला मिळणार नाही.
गोरेगाव (पूर्व) येथील स्क्वाटर कॉलनी परिसरात अस्तित्वात असलेली ६०० मिमी रुंदीची पर्जन्य जलवाहिनीची क्षमतावाढ करत ही जलवाहिनी १५०० मिमीची करण्यात आली आहे. स्वामी विवेकानंद मार्ग ते लिंकिंग रोड दरम्यान असलेला जे. के. मेहता रस्ता व परिसर हा सखल भाग आहे. येथे पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक ठप्प होते. काही सोसायट्यांमध्येदेखील पाणी भरते. त्याचा परिणाम सांताक्रूझ स्थानक परिसरापर्यंत होतो. यावर उपाय म्हणून जे. के. मेहता रस्त्यावरील ४३० मीटर लांबीची बॉक्स ड्रेन १.५ मीटर रुंदीवरून ३.० मीटर रुंदीची करण्यात आली आहे. त्यामुळे या भागाला दिलासा मिळेल. कांदिवली (पूर्व) येथील आकुर्ली मार्ग ते पश्चिम द्रुतगती मार्ग परिसरातील सखल भागात जास्त पाऊस झाल्यानंतर जलमय परिस्थिती निर्माण होते. रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम होतो. पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून आकुर्ली मार्गावरील ठाकूर हाऊस व आकुर्ली मार्गावरील सार्वजनिक शौचालयासमोर बॉक्स ड्रेन रुंद करण्यात आले. तसेच आकुर्ली छेद मार्ग क्रमांक ३ येथील रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या रुंद करण्यात आल्याचा फायदा होईल, असा विश्वास पर्जन्य जलवाहिन्या खात्याने व्यक्त केला आहे.
मात्र याव्यतिरिक्‍त ३१ अन्य कामे प्रगतिपथावर असून त्यामध्ये बॉक्स ड्रेनच्या कामाचा समावेश आहे. ही कामे २०२४ च्या पावसाळ्यापर्यंत पूर्ण होणार आहेत. पश्चिम उपनगरात उर्वरित कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करीत असल्याचे उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी सांगितले. मात्र याचा फटका पावसाळ्यात बसणार असल्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

नालेसफाई आणि रुंदीकरण तसेच खोलीकरण आणि विस्तारीकरणाची कामे पालिका क्षेत्रात सुरू आहेत. मुंबईतील सखल भागांमध्ये अंधेरी सबवेसह अनेक नागरी वस्तीच्या भागात नागरिकांना पाणी साचण्यापासून दिलासा मिळेल. प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे.
- पी. वेलरासू, अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com