Fri, Sept 22, 2023

‘विस्मयकारी शुक्र’वर व्याख्यान
‘विस्मयकारी शुक्र’वर व्याख्यान
Published on : 6 June 2023, 12:30 pm
मुंबई, ता. ६ ः खगोल मंडळातर्फे प्रीतेश रणदिवे यांचे ‘विस्मयकारी शुक्र’ या विषयावर बुधवार (ता. ७) सायंकाळी ७ वाजता व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानात शुक्राचे अवलोकन सकाळी अथवा सायंकाळी का करावे, चंद्राप्रमाणे शुक्राची कोर दिसते ती कशी पाहावी यासारख्या विस्मयकारक गोष्टींची वैज्ञानिक माहिती या व्याख्यानात मिळेल. श्रोत्यांच्या सहभागानुसार मराठी-इंग्रजीतून होणाऱ्या या विनाशुल्क व्याख्यानाचा खगोलप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. साधना विद्यालय, पाचवा मजला, शीव (प.), मुंबई येथे हे व्याख्यान होईल.