दिल्ली पोलिस असल्याचे सांगून लुटणाऱ्यांना राजस्थानमधून अटक

दिल्ली पोलिस असल्याचे सांगून लुटणाऱ्यांना राजस्थानमधून अटक

मुंबई, ता. ६ : दिल्ली गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करून चौघांनी तीन कोटी ७५ लाखांच्या हिऱ्यांच्या दागिन्यांसह व्यापारी व त्याच्या कर्मचाऱ्याचे शीव परिसरातून अपहरण केले होते. याप्रकरणी राजस्थानमधील देराजसर येथून महेंद्र व मनोज या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनी किशननाथ व अशोक यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची माहिती उघड झाली आहे.
आरोपींकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. आरोपींनी व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला एका कारमध्ये बसवून भिवंडीत नेले आणि तेथे मारहाण करून त्याच्या ताब्यातील हिऱ्यांचे दागिने व रोख असा दोन कोटी ६२ लाखांचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला होता.
तक्रारदार हरिराम घोटिया सध्या हैदराबादमध्ये दागिने घडवण्याचे काम करतात. त्यांचे मालक संतोष नारेडी २७ लाख रुपये रोख आणि एकूण २ कोटी ६२ लाख रुपयांचे दागिने घेऊन ३१ मे रोजी मुंबईत आले होते. तेव्हा तिथे आलेल्या चौघांनी दिल्ली गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांचे अपहरण केले होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून प्रथम आरोपींची ओळख पटवण्यात आली आणि त्यानंतर खबऱ्यांकडू मिळालेल्या माहितीनुसार त्यांना राजस्थानमधून ताब्यात घेण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com