पुनर्विकासासाठी नवे धोरण ः श्रीकांत शिंदे

पुनर्विकासासाठी नवे धोरण ः श्रीकांत शिंदे

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः मुंबईतील जुन्या इमारतींचा पुनर्विकास गेली अनेक वर्षे रखडला आहे. वसाहतींची साफसफाई, पाणी समस्या, परिसर विकास आदी समस्या सोडवायला हव्यात. ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये अनेक वर्षापासून रहिवासी राहत असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी म्हाडा, एसआरए, पालिका आदी प्राधिकरणांना एकत्र आणून नवे धोरण तयार करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

धोरण नसल्याने या ट्रान्झिस्ट कॅम्पच्या समस्या सुटू शकलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक वर्षांपासून येथील रहिवासी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या वसाहतींची स्वच्छता, पाणी, आरोग्याची समस्या तसेच तेथील एकूणच परिसराचा विकास हाती घेणे आवश्यक आहे. या इमारती विविध प्राधिकरणाच्या अखत्यारीत असल्याने सर्व प्राधिकरणाने एकत्रित आणून धोरण तयार करून रहिवाशांचे प्रश्न सोडवले जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. याबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशी त्यांनी चर्चा केली असून आयुक्त सकारात्मक असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

ठाण्यातील इमारतींचा रखडलेला पुनर्विकास समूह विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) च्या माध्यमातून केला जाणार आहे. यावर मुख्यमंत्रीही सकारात्मक आहेत. सिडकोच्या अखत्यारीत घरे बांधली जाणार आहेत. ठाण्याच्या धर्तीवर मुंबईतील इमारतींचाही पुनर्विकास करण्याचा विचार केला जाईल. त्यासाठी सर्व प्राधिकरणांना एकत्र आणून निर्णय घेतला जाईल, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com