कुटुंबीयांच्या वादातून आत्महत्येचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुटुंबीयांच्या वादातून आत्महत्येचा प्रयत्न
कुटुंबीयांच्या वादातून आत्महत्येचा प्रयत्न

कुटुंबीयांच्या वादातून आत्महत्येचा प्रयत्न

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : कौटुंबिक वादातून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. ही घटना ३ जून रोजी घडली होती. पोलिसांनी सतर्कता दाखवत तिला रुग्णालयात दाखल केल्यामुळे मुलीचे प्राण वाचले. पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी मुलीचा जीव वाचवल्याबद्दल पथकातील अधिकाऱ्यांचा सत्कार केला.

मुंबई येथील एका धर्मशाळेत मूळचे राजस्थानचे एक कुटुंब वास्तव्यास आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वाद झाल्याने १६ वर्षीय मुलीने ब्लेडने वार करत मनगट चिरून घेतले. मुलीला मोठ्या प्रमाणात रस्तस्राव सुरू झाल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी खार पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर निर्भया पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकातील महिला कॉन्स्टेबलने जखमी मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे तिच्यावर वेळीच उपचार करण्यात आले. सध्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.