हिरे व्यापाऱ्याची ५ कोटींची फसवणूक

हिरे व्यापाऱ्याची ५ कोटींची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबई पोलिसांनी एका बांधकाम व्यावसायिकासह ३ आरोपींविरुद्ध मालमत्ता व्यवहारात ५.३७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

पीडित व्यापाऱ्याची हिरे व्यापारी आणि त्याचा मुलगा यांच्याशी २०१६ मध्ये पहिली भेट झाली होती. या व्यापाऱ्याची बांधकाम क्षेत्रात कार्यरत कंपनीदेखील आहे. त्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधीची गरज असल्याचे पीडित व्यापाऱ्याला त्यांनी सांगितले. या रकमेच्या विरोधात आरोपींनी पीडित व्यापाऱ्याला वाकोला प्रकल्पात ११००० चौरस फूट ५००० रुपये प्रतिचौरस फूट दराने एफएसआय देण्याचे आश्वासन देत त्यासाठी कराराचा मसुदा तयार करायचे आश्वासन दिले. तक्रारदाराने सुरुवातीला आरोपींना २ कोटी रुपये रोख दिले. काही दिवसांनी १२.५ लाख रुपये दिले. फेब्रुवारी २०१७ मध्ये आरोपींनी पुन्हा तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली. त्यांनी ते हप्त्यांमध्ये हस्तांतरित केले. तक्रारदाराने प्रॉपर्टी डीलमध्ये दीड वर्षांच्या कालावधीत ५.३७ कोटी रुपयांचा खर्च केला; परंतु त्याला जे आश्वासन देण्यात आले होते ते पूर्ण झाले नाही किंवा त्याचे पैसे परत मिळाले नाहीत. अखेर पीडित व्यापाऱ्याने पोलिसांत गुन्ह्याची नोंद केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com