ग्राहक संरक्षण फाऊंडेशनच्या पदाधिकारी नियुक्त्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्राहक संरक्षण फाऊंडेशनच्या पदाधिकारी नियुक्त्या
ग्राहक संरक्षण फाऊंडेशनच्या पदाधिकारी नियुक्त्या

ग्राहक संरक्षण फाऊंडेशनच्या पदाधिकारी नियुक्त्या

sakal_logo
By

किन्हवली, ता. ७ (बातमीदार) : अन्याय झालेल्या ग्राहकांच्या संरक्षणासाठी किंवा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी देशभरात सक्रिय असलेल्या ग्राहक संरक्षण फाऊंडेशन या केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त संस्थेने राज्यात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या फाऊंडेशनने देशातील पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली आदी राज्यात आपल्या शाखा स्थापन केल्या असून उर्वरित राज्यांत नवीन शाखा सुरू करण्यास सुरुवात केली आहे. संस्थेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष डी. व्ही. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे झालेल्या संस्थेच्या एकदिवसीय शिबिरात शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील राजेश दत्तात्रेय घागस यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी; तर मुरबाड तालुक्यातील संगमगाव येथील दिनेश सावळाराम जाधव यांची ठाणे जिल्हाधक्ष पदी निवड करण्यात आली असून नियुक्तीपत्रेही प्रदान करण्यात आली.