प्रभाग कार्यालयात पाण्यासाठी धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभाग कार्यालयात 
पाण्यासाठी धडक
प्रभाग कार्यालयात पाण्यासाठी धडक

प्रभाग कार्यालयात पाण्यासाठी धडक

sakal_logo
By

विरार, ता. ७ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या आय प्रभाग समिती कार्यालय परिसरात पाणी कृत्रिम टंचाईवरून काँग्रेसच्या वतीने आज (ता. ७) ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत महापालिका प्रशासनाने काँग्रेस जिल्हा कार्यालय सरचिटणीस किरण शिंदे यांच्याशी चर्चा केल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाची तत्काळ दखल घेत महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी पाणीपुरवठा मुख्य अधिकारी यांना वसई आय प्रभागात जाऊन काँग्रेस शिष्टमंडळासोबत बैठक करण्याच्या सूचना दिल्या. पाणीपुरवठा मुख्य अधिकारी सुरेंद्र ठाकरे, आय प्रभाग सहायक आयुक्त गिलसन गोन्सालवीस, आय प्रभाग पाणीपुरवठा अधिकारी तथा बांधकाम अभियंता प्रकाश साटम यांनी प्रभाग समिती सभागृहात काँग्रेस शिष्टमंडळासोबत चर्चा केली व कारवाईचे आदेश दिले. प्रभागातील जुन्या पाईपलाईन त्वरित बदलण्यात याव्यात, कोळीवाडा, हात्ती मोहल्ला, वाल्मिकीनगर परिसरातील वॉलमन यांची त्वरित बदली करणे, जुने व लिकेज वॉल त्वरित दुरुस्त करणे, आय प्रभागात कमीत कमी एक तास पाणी द्यावे, पाण्याच्या तक्रारीसाठी मुख्यालयात ऑनलाईन तक्रार सुरू करावी, या विषयावर चर्चा करण्यात आली. या ठिय्या आंदोलनात फिशरमन सेलचे जिल्हाध्यक्ष व्हेलेंटाईन मिर्ची, आनंद चव्हाण, सलीम खिमाणी, रॉईस फरेल, प्रवीणा चौधरी, शबाना कुरेशी, विल्फ्रेड डिसुजा, राजू देवडा, निखिलेश उपाध्याय, कुलदीप वर्तक, विजय बंगा, आशा मस्तान आदी हजर होते.