ठाण्यात ९० मीटर बॉक्स जळून खाक

ठाण्यात ९० मीटर बॉक्स जळून खाक

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : तळमजल्यावरील मीटर बॉक्स रूममध्ये आग लागून ९० मीटर बॉक्स जळून खाक झाले आहेत. तसेच या आगीने मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने इमारतीत अडकलेल्या तब्बल १५० नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणे एक ते एक वाजण्याच्या सुमारास तुळशीधाम रोड, धर्मवीर नगर येथील आशीर्वाद सोसायटीच्या इमारत क्रमांक २२ मध्ये घडली. आग जवळपास एक तासांनी नियंत्रणात आली असून सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
आशीर्वाद सोसायटीच्या इमारत क्रमांक २२ मधील तळ मजल्यावरील असेलल्या मीटर बॉक्स रूममध्ये शुक्रवारी अचानक आग लागली. आगीने क्षणार्धात पेट घेतला. तसेच या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर इमारतीच्या परिसरात पसरल्याने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चितळसर मानपाडा पोलिस, महावितरण विभाग आणि बाळकुम अग्निशमन दलाने धाव घेतली. आगीमुळे धूर जास्तच पसरल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीमध्ये अडकलेल्या सुमारे १५० रहिवाशांची सुखरूप सुटका केली. या घटनेत इमारतीमधील एकूण ९० मीटर बॉक्स पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. मीटर बॉक्सला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास एक तासांनी म्हणजे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून ही आग शॉटसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com