मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक : प्रवाशांचे होणार हाल ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक : प्रवाशांचे होणार हाल !
मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक : प्रवाशांचे होणार हाल !

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक : प्रवाशांचे होणार हाल !

sakal_logo
By

तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई, ता. ९ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेच्या तांत्रिक कामासाठी रविवारी (ता. ११)रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाउन धिम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सोबतच पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी ते गोरेगाव स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी पश्चिम रेल्वेने शनिवारी- रविवारी १४ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे.
.......
मध्य रेल्वे -
कुठे- सीएसएमटी- विद्याविहार अप आणि डाउन धिम्या मार्गावर
कधी- सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
परिणाम- सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील. पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी ते गोरेगाव स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी पश्चिम रेल्वेने शनिवारी-रविवारी १४ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक पश्चिम रेल्वेच्या अप- डाऊन दोन्ही मार्गावर आणि अप -डाऊन हार्बर मार्गावर असणार आहे. त्यामुळे अनेक लोकल सेवा रद्द असणार आहे. तर मेल- एक्स्प्रेसचा वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
...
हार्बर रेल्वे
कुठे - पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर
कधी - सकाळी ११. ०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम - ब्लॉक कालावधीत पनवेल/बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. सोबतच पनवेल येथून ठाणे करिता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाणेकरीता सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
...
पश्चिम रेल्वे
जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यानच्या अप आणि डाऊन दोन्ही लोकल मार्गांवर तसेच अप आणि डाऊन हार्बर मार्गावर १४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्री १२ ते रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत असणार आहे. या ब्लॉकमुळे अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सर्व अप आणि डाऊन लोकल जलद मार्गावर चालवल्या जातील आणि प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे राम मंदिर स्थानकावर थांबणार नाही. याशिवाय मध्य रेल्वेवरून धावणाऱ्या सर्व हार्बर मार्गावरील सेवा वांद्रे स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहे. चर्चगेट ते बोरिवली स्थानकादरम्यान काही धीम्या लोकल सेवा शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील आणि परतीच्या दिशेने ही ट्रेन अंधेरीहून धावणार आहे.