धर्मपरिवर्तन प्रकरणाला वसईत पुष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धर्मपरिवर्तन प्रकरणाला वसईत पुष्टी
धर्मपरिवर्तन प्रकरणाला वसईत पुष्टी

धर्मपरिवर्तन प्रकरणाला वसईत पुष्टी

sakal_logo
By

नालासोपारा, ता. ९ (बातमीदार) : मुंब्रा परिसरात ४०० हिंदूंचे मुस्लिम धर्मपरिवर्तन झाले असल्याच्या चर्चेने संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, धार्मिक वातावरण ढवळून निघाले आहे; मात्र या सर्व प्रकरणाला वसईत पुष्टी मिळाली असून, यात वसईतील एका राजेश जानी या व्यक्तीला हिंदू धर्मातून इस्लाम धर्मात परिवर्तित केले असल्याचा दावा त्याच्याच कुटुंबीयांनी केला आहे. सध्या राजेश जानी हा बेपत्ता असून, त्याची तक्रार वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. याबाबत माणिकपूर पोलिसानी शुक्रवारी (ता. ९) सर्व कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. राजेशला शोधून या सर्व प्रकारांची सत्यता काय आहे, हे आम्ही पाहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
राजेश जानी ऊर्फ मोहम्मद रियाज (वय ५०) असे धर्मपरिवर्तित झालेल्या व्यक्तीचे नाव असून, तो वसईच्या साईनगर येथे त्याच्या कुटुंबीयांसह राहत होता. तो जोगेश्वरी येथील कंपनियल कंपनीमध्ये सेल्समनचे काम करत होता. २५ मे २०२३ रोजी सकाळी साडेदहा वाजता कामानिमित्त तो घरातून बाहेर पडली होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला. दुसऱ्या दिवशी त्यांच्या कुटुंबीयांनी २६ मे रोजी वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. राजेश जानी यांच्या घरी पत्नी (वय ४६), २२ वर्षांची मोठी मुलगी आणि १८ वर्षांचा मुलगा आहे.

-----------------
संवादाची ऑडिओ क्लिप
राजेश जानी हा बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. तुमच्या पतीने इस्लाम कबूल केला आहे. इस्लाम धर्म खूप चांगला आहे. तुम्ही इस्लाम धर्मात परिवर्तित होऊ शकता. आतापर्यंत ४०० कुटुंबांना आम्ही परिवर्तित केले आहे. तुमचा पती माझ्याकडेच मुंब्रा येथे राहण्यास आहे, असे सांगण्यात आल्याची एक ऑडिओ क्लिपही जानी कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे; मात्र हिंदूमधून इस्लाम धर्मात परिवर्तित करण्यासाठी कुटुंबाला फोन करून राजी करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव सांगितले नाही, तो मुंब्र्याचा आहे, एवढेच सांगण्यात येत आहे. राजेश जानी यांच्या मुलांसोबत हा संवाद झालेला आहे.


--------------
हिंदू-मुस्लिम धर्मांतर याबाबत आमच्याकडे तक्रार नाही. राजेश जानी हा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल आहे. आज आम्ही जानी कुटुंबीयांचे जबाब घेतले आहेत. सध्या बेपत्ता व्यक्तीला शोधून आणणे आणि खरी परिस्थिती काय आहे, याची सत्यता पडताळल्याशिवाय धर्मांतराविषयी बोलता येणार नाही. आम्ही याची सत्यता काय, हे लवकरच शोधू.
- पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलिस उपायुक्त