राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या खेळाडूंचा बोलबाला

राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या खेळाडूंचा बोलबाला

कल्याण, ता. १३ (बातमीदार) : झारखंड (राची) येथे स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने नुकत्याच झालेल्या चौथ्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये कल्याणच्या खेळाडूंचा बोलबाला होता.
राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत कल्याणमधील लोककल्याण पब्लिक स्कूलच्या आठवीमध्ये शिकणाऱ्या आस्था प्रकाश नायकर हिला पॉईंट टू पॉईंट १५ हजार किमी शर्यतीत सुवर्णपदक मिळाले. तिने सर्वांत जास्त ३३ पॉईंट मिळवून तामिलनाडू, वेस्ट बंगाल, कर्नाटक, बंगलोर अशा सर्व खेळाडूंना मागे टाकत महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. आस्थाने ४२ किलोमीटर सतत दोन तास मॅरेथॉन करून तिथेही सहावा क्रमांक पटकावला. कल्याणच्या सेंट मेरी हायस्कूल आठवीमध्ये शिकत असलेल्या देवांश राणे यानेही १०० मीटर स्केटिंग इनलाईन प्रकारात कांस्यपदक पटकावले. या दोघांनाही पवन ठाकूर व पुष्पेंद्र सिंग यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com