नरेंद्र मोदी आधुनिक भारताचे नवनिर्माते

नरेंद्र मोदी आधुनिक भारताचे नवनिर्माते

डहाणू, ता. १८ (बातमीदार) : स्वकर्तृत्वाने संघर्षमय जीवन जगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रांत कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. त्याचबरोबर जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याबरोबरच, त्यांनी देशाला समृद्ध आणि सामर्थ्यशाली बनवण्याचे काम केले आहेत. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने देशाचे नवनिर्माते आहेत, असे विचार डहाणू नगराध्यक्ष आणि भाजप डहाणू विधानसभाप्रमुख भरतसिंग राजपूत यांनी मांडले.

डहाणू शासकीय विश्रामगृहावर केंद्रातील मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळातील विकासकामांची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भरतसिंग राजपूत बोलत होते. या वेळी माजी आमदार अमित घोडा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भरत शहा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे, तलासरी मंडळ अध्यक्ष शिवाजी महाला, नगरसेवक जगदीश राजपूत, पुंडलिक भानुशाली, दिनेश मर्दे, मिलिंद मावळे, चंद्रकांत खुताडे आदी नेते उपस्थित होते. गरीब कल्याणकारी योजनांचा लाभ देशातील ८० कोटी नागरिकांनी घेतला आहे. त्यात तीन कोटी घरकुले, तर ११.८ कोटी घरांमध्ये पिण्याचे पाणी पोहोचले. कलम ३७० रद्द केले, तर तिहेरी तलाक पद्धत रद्द करून मुस्लिम महिलांना न्याय सन्मान मिळवून दिला, त्याशिवाय अनेक कालबाह्य कायदेही रद्द केले. नवीन शैक्षणिक धोरण आराखडा मंजूर करून शिक्षण प्रक्रियेत सकारात्मक परिवर्तन घडविण्यात पोषक वातावरणनिर्मिती केली, असेही भरतसिंग राजपूत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com