एनएमएमटीचा थांबा गैरसोयीचा

एनएमएमटीचा थांबा गैरसोयीचा

जुईनगर, ता. १३ (बातमीदार) : जून महिना सुरू झाला, तरी कमालीचा उकाडा सुरू आहे. अशातच नेरूळ येथील बांचोली चौक बस थांब्यात गेल्या सहा महिन्यांपासून आसनव्यवस्था गायब असल्याने प्रवाशांना भरदुपारी उन्हातच उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.
नेरूळ, सेक्टर १० आणि नेरूळ गाव येथील मुख्य मार्गावर बांचोली बस स्थानक आहे. या स्थानकाला लागून पंडित जवाहरलाल नेहरू हायस्कूल, नामदेव भगत हायस्कूल आणि ज्युनि. कॉलेज, तेरणा हायस्कूल आहे. तसेच सीबीडी, खारघर, उलवेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याच ठिकाणावरून बस क्रमांक २२, २०, १४ आणि १८ तसेच बेस्ट उपक्रमाची ५०२ बस पकडणे सोयीचे ठरत आहे. याशिवाय उलवे येथे नोकरी तसेच घरकाम करणाऱ्या महिलांसाठी हा थांबा उपयुक्त असल्याने येथून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, या थांब्यातील आसनव्यवस्था मागील सहा महिन्यांपासून गायब असून भरउन्हात अंगाची लाहीलाही होत असताना उभे राहूनच बसची प्रतीक्षा करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
-----------------------------------------------
अनेक महिन्यांपासून बस स्थानकातील आसनव्यवस्था गायब आहे. त्यामुळे भरउन्हात उभे राहावे लागते, बस वेळेत येत नसल्यामुळे तासन् तास ताटकळत बसची वाट पाहावी लागते. संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन बस स्थानकातील आसने बसवावीत.
- ज्योती कुऱ्हाडे, प्रवासी
------------------------------------------------
नेरूळ येथील बांचोली चौकातील बस स्थानकाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, यासाठीचे निवेदन नवी मुंबई परिवहन उपक्रम विभागाला दिलेले आहे. शाळा सुरू झाल्या आहेत. इथे प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने किमान आसनव्यवस्था असणे गरजेचे आहे.
- प्रदीप गवस, माजी सभापती, नवी मुंबई परिवहन विभाग
------------------------------------------
नवी मुंबई परिवहन विभागाने बस स्थानकाची दुरुस्ती आणि देखभाल करण्याचा ठेका संबंधित कंत्राटदारांना दिला आहे. संबंधित ठिकाणी पाहणी करून बस स्थानकाची दुरुस्ती केली जाईल.
- योगेश कडूस्कर, परिवहन व्यवस्थापक, नवी मुंबई परिवहन विभाग
----------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com