सायन-माटुंगा रेल्वेमार्गाजवळील नाला कचऱ्याने भरला

सायन-माटुंगा रेल्वेमार्गाजवळील नाला कचऱ्याने भरला

सायन-माटुंगा रेल्वेमार्गाजवळील नाला कचऱ्याने भरला
धारावी, ता. १४ (बातमीदार) : पालिका अधिकारी व रेल्वेचे अधिकारी नालासफाईचे अनेक दावे करत असले तरीही वास्तवात रेल्वे मार्गाजवळील नाले अजूनही साफ झाले नसल्‍याचे दिसून येत आहे. मध्य रेल्वेवरील शीव-माटुंगादरम्यान असलेला नाला गाळाने व कचऱ्याने भरला आहे. हा नाला वेळीच साफ झाला नाही तर त्याचा परिणाम रेल्वेवर होण्याची शक्‍यता प्रवासी व्यक्‍त करत आहेत.
स्‍थानिकांनी दिलेल्‍या माहितीनुसार दरवर्षी रेल्‍वे मार्गाच्या याच टप्प्यात नाल्याचे सांडपाणी रुळावर येऊन रेल्वे वाहतूक ठप्प पडते. हा टप्पा सखल असल्यामुळे पावसाचे पाणी साचण्यास लगेच सुरुवात होते. पावसाळा तोंडावर आला तरीही येथील नालेसफाई केली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. रेल्वे प्रशासनाने लवकरात-लवकर नालेसफाई करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com