भिवंडीत साडेतीन लाखांची चोरी उघड

भिवंडीत साडेतीन लाखांची चोरी उघड

भिवंडी, ता. १३ (बातमीदार) : वीजचोरीचे प्रमाण कमी होत असतानाच भिवंडी शहरात पुन्हा साडेतीन लाखांची वीजचोरी झाल्याचे उघड झाले आहे. टोरेंट कंपनीच्या भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी नुकतेच दोन वीजचोरांवर कारवाई केली. वीजचोरीप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इम्तेझ अन्सारी, तय्यब हमीद मुमताज अन्सारी, शिवाजी श्रीपत भोईर अशी वीजचोरांची नावे आहेत. अन्सारी मदीना मस्जिदजवळील अहमदिया अपार्टमेंटमध्ये राहणारे इम्तेझ आणि तय्यब या दोघांनी ३ ऑगस्ट २०२२ ते २७ एप्रिल २०२३ पर्यंत टोरेंटच्या मिनी सेक्शन पिल्लरमधून दोन कोर काळ्या रंगाची केबल अनधिकृतपणे जोडली होती. यातून त्यांनी ७२१९ युनिटचा वापर करून १ लाख ८१ हजार ७४ रुपयांची वीजचोरी केली आहे. तर महामार्ग दिवा येथील शिवाजी भोईर याने १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत सिंटेक्स बॉक्समध्ये दोन कोर काळ्या रंगाच्या केबल अवैध जोडून वीजमिटरच्या ७४०४ युनिटचा वापर केला. यातून त्यांनी १ लाख ६९ हजार १४१ रुपयांची वीजचोरी केली आहे. एकूण ३ लाख ५० हजार २१५ रुपयांच्या वीजचोरीप्रकरणी टोरेंटचे एक्झ्युक्युटिव्ह कर्मचारी अंकित कुमार सिंग आणि शंकर गणपती सावरकर या दोघांच्या फिर्यादीवरून तिघा वीजचोरांवर शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राज माळी करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com