पोलिस अधिकारी बागडे यांच्याविरोधात तक्रार

पोलिस अधिकारी बागडे यांच्याविरोधात तक्रार

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ ः भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत भाजपने पोलिस अधिकारी शेखर बागडे यांची बदली करण्याची मागणी केली आहे. बागडे यांना सक्तीच्या रजेवर सध्या पाठवण्यात आले आहे. यानंतर आता भाजपने बागडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची सुमारे ५० ते ६० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे दाखल केली आहे.

भाजपचे पदाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय नंदू जोशी यांच्यावर एका महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपचे नेते, पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणावरून मंत्री चव्हाण आक्रमक झाल्याने राष्ट्रवादीसह इतर पक्षांच्या नेत्यांनीदेखील त्यांना समर्थन दिले. यातून भाजपने कल्याण, ठाणे, पालघर लोकसभेसाठी दावा करून शिंदेंच्या शिवसेनेला कैचीत पकडले आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा या ठिकाणी लागू होत असल्याने ईडीकडेही बागडे यांची तक्रार केली जाणार आहे, असे भाजप नेत्यांनी सांगितले. शेखर बागडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या खास मर्जीतले म्हणून ओळखले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com