वसई-विरारसाठी अतिरिक्त पाणी पुरवठा

वसई-विरारसाठी अतिरिक्त पाणी पुरवठा

विरार, ता. १८ (बातमीदार) : पालघर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्सोवा-विरार-पालघर सागरी पूल आणि वसई-विरार शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा मार्गी लागणार असल्याचे जाहीर केले होते. यासाठी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या प्रकल्पांना तातडीने मंजुरी देण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. वसई-विरारमधील नागरिकांसाठी अतिरिक्त पाणीपुरवठा मिळावा, यासाठी मागणी केली होती. वर्सोवा-विरार-पालघर सागरी पुलामुळे दळणवळण सोयीचे होण्यास मदत होईल. नागरिकांच्या मागण्यांची दखल घेऊन तत्परतेने घोषणा केल्याबद्दल आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे प्रवाशांना विनाअडथळा वाहतुकीचा अनुभव मिळण्यास मदत होईल. या प्रकल्पांमुळे आदिवासी, शेतकरी आणि मच्छीमार बांधवांच्या परिसराची प्रगती आणि समृद्धी होण्यास मदत होईल.

वसई-विरार शहरातील पायाभूत सुविधा आणि शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याची मागणी यापूर्वी केली होती. मुख्यमंत्र्यांनी यावर शिक्कामोर्तब केला असून लवकरच ही कामे मार्गी लागतील, असा विश्वास आहे.
- क्षितिज ठाकूर, आमदार, नालासोपारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com