पादचारी पुलांना अवकळा

पादचारी पुलांना अवकळा

Published on

वाशी, ता. १८ (बातमीदार) ः ठाणे ते बेलापूर मार्गावरील रबाळे तसेच बोनकाडे येथील स्कायवॉकची अवस्था दयनीय आहे. या स्कायवॉकची तोडफोड करण्यात आली असल्याने पालिकेने त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पूर्व आणि पश्चिमेला जोडण्यासाठी स्कायवॉक उभारण्यात आले आहेत. ऐरोली रेल्वे स्थानक येथे एमआयडीसीच्या माध्यमातून, तर रबाळे रेल्वे स्थानक, बोनकोडे येथेदेखील रेल्वे लाईनवरून येण्या-जाण्यासाठी स्कायवॉक उभारण्यात आहेत. या स्कायवॉकमुळे ट्रान्स हार्बर मार्गावरून एमआयडीसी भागातील कंपन्यामध्ये जाणाऱ्या शेकडो नागरिक उपयोग होत आहे. तर बोनकोडे गावातील नागरिक स्कायवॉकच्या आधारे गावात तसेच एमआयडीसीतील कंपन्या, ठाणे-बेलापूरकडे जाण्याकरीता वाहने पकडण्यासाठी याचा वापर करत आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या स्कायवॉकची डागडुजी करण्यात आलेली नाही. बोनकोडे येथील स्कायवॉकची उद्वाहक अनेक दिवसांपासून बंद आहे; तर स्कायवॉकवरील छतदेखील उडाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात छतातून पाणी गळत असल्याने नागरिकांना छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे; तर रबाळे रेल्वे स्थानकानजीक स्कायवॉकची अवस्था गंभीर असून दोन्ही उद्ववाहक बंद असल्याने अपंगांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबई महापालिका स्वच्छ भारत अभियान सर्वत्र राबत आहे; परंतु या दोन्ही स्कायवॉकवर साचलेला कचरा उचलण्यात येत नसल्याने परिसराला अवकळा आलेली आहे.
---------------------------------------------
रात्रीच्या वेळी अंधाराचे राज्य
रबाळे तसेच बोनकोडे येथील स्कायवॉकवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते; मात्र अनेकदा या ठिकाणची विजेची यंत्रणा बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रेमीयुगुले, तृतीयपंथी, गर्दुल्यांचा वावर स्कायवॉकवर असतो. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून पालिकेने या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.