डहाणूतील चिखले गावात रंगणार योग शिबिर

डहाणूतील चिखले गावात रंगणार योग शिबिर

Published on

बोर्डी, ता. १८ (बातमीदार) : राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. ‘हर घर अंगण योग’ ही टॅगलाईन व वसुधैव कुटुंबासाठी योग ही संकल्पना घेऊन योग दिन साजरा करण्यात येणार आहे. डहाणू तालुक्यातील चिखले गावाची आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यासाठी ही बाब अभिमानास्पद असल्याचे आरोग्य खात्याने प्रसिद्ध केले आहे.

भारत सरकारकडून २१ जून रोजी ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. हर घर -अंगण योग ही टॅगलाईन आणि वसुधैव कुटुंबासाठी योग ही संकल्पना घेऊन योग दिन साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत आयुष ग्राम हा उपक्रम राबविला जात आहे. चिखले गाव, तालुका- डहाणू या पालघर जिल्ह्यातील सक्रिय आयुष ग्रामची भव्य आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याकरिता राज्य सरकारकडून निवड करण्यात आली आहे. आयुर्वेदिक दवाखाना, चिखले येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, डहाणू तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता बारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत हे उपक्रम चिखले गावात राबवले जात आहेत. ६ एप्रिल २०२३ रोजी नीती आयोगाच्या पथकाने चिखले येथे आयुष ग्राम उपक्रमाची पाहणी करण्याकरिता भेट दिली होती. १५ जूनपासून योग संबंधित विविध उपक्रमांची सुरुवात झाली आहे. जिल्हा आयुष अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी योगविषयी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.