खारघरमध्ये विजेचा अवेळी लपंडाव

खारघरमध्ये विजेचा अवेळी लपंडाव

खारघर, ता. १८ (बातमीदार) : खारघर वसाहतीमधील अनेक सेक्टरमध्ये सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे. अवेळी खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे इमारतींमधील उद्ववाहक बंद पडण्यापासून घरातील वातानुकूलित यंत्रे, पंखे बंद पडत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
खारघर वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. शुक्रवारी (ता.१६) पहाटे तीन ते साडे चारच्या दरम्यान काही सेक्टरमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पहाटेच घरातील वातानुकूलित यंत्र, तसेच पंखे बंद पडल्याने अनेकांची झोपमोड झाली होती. यावेळी पहाटे पाचच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत झाला. दरम्यान शनिवारी (ता.१७) खारघर सेक्टर १२, १३, १९ ते २१ आणि सेक्टर ३४, ३५ मध्ये दिवसातून वारंवार पुरवठा खंडित होत असल्याचे प्रकार होत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीपुरवठा झाला नसल्याने विविध अडचणींना नागरिकांना तोंड द्यावे लागत होते. याबाबत खारघर सेक्टर १२ मधील महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांकडे विचारणा केली असता, वाढत्या उष्णतेमुळे विजेच्या मागणीत वाढ झाली असून किरकोळ बिघाडामुळे पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याचे कारण देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com