नवीन घरकामगार कायदा लवकरच

नवीन घरकामगार कायदा लवकरच

नवीन घरकामगार कायदा लवकरच?
महिलांच्या श्रम सन्मान मेळाव्यात प्रतिनिधींचे समर्थन
धारावी, ता. १८ (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त घरकामगार महिलांचा श्रमसन्मान मेळावा शुक्रवारी (ता. १६) मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय घरकामगार चळवळ (नॅशनल डोमेस्टिक वर्कर वेल्फेअर ट्रस्ट)च्या वतीने आयोजित या मेळाव्यामध्ये नव्या घरकामगार कायद्यासाठी विधेयक मांडून त्‍याला उपस्‍थित प्रतिनिधींचे समर्थन मिळवण्यात आले.
गेल्‍या ३५ वर्षांच्या लढाईतून घरकामगार महिलांनी भारतात प्रथमच महाराष्ट्रात घरेलू कामगार कल्याण मंडळ कायदा सरकारला करण्यास भाग पाडले आहे. सोबतच कामगार हक्क म्हणून किमान वेतन कायद्यात घरकामगारांचा समावेश करण्यास केंद्र तसेच राज्य सरकारला भाग पाडले आहे. या पार्श्वभूमीवर मंडळ कायद्याची व योजनांची अवस्था राज्य सरकारने करून ठेवली आहेत, याविरुद्ध घरकामगार महिला आक्रमकपणे सरकारला जाब विचारणार आहेत. दरम्‍यान मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले मंडळ त्रिपक्षीय बनवण्याच्या आदेशाचे पालन करण्यासाठी व किमान वेतन कायद्याचा जाहीरनामा तातडीने जाहीर करून किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी राज्यात सुरू होण्यासाठी श्रमसन्मान मेळाव्यात आग्रह धरण्यात आला. सोबतच हे मंडळ कायद्याचे रूपांतर कामगार हक्क आधारित नव्या घरकामगार कायद्यात व्हायला हवे, यासाठी सभेत नवे विधयक मांडून त्या सभेत उपस्थित प्रतिनिधी यांचे समर्थन मिळवण्यात आले.
श्रम सन्मान मेळाव्यात प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार सुप्रिया सुळे, खासदार अरविंद सावंत, राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते, महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, महाराष्ट्रचे नेते उदय भट, राष्ट्रीय घरकामगार चळवळ, भारतच्या राष्ट्रीय समन्वयक ख्रिस्तीन मेरी उपस्थित होते.

घर कामगार हे समाजासाठी महत्त्‍वाचा भाग आहे. त्यांच्या कामाला योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. त्यांच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे.
- खासदार अरविंद सावंत

महिलांचा सन्मान केला गेला पाहिजे. माझ्या पातळीवर जे मला करता येईल ते मी करीन.
- खासदार सुप्रिया सुळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com