कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भाजपची बैठक

कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भाजपची बैठक

Published on

भिवंडी, ता. १८ (प्रतिनिधी) : मोदी@९ अंतर्गत भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत टिफीन बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत महा-जनसंपर्क अभियान यशस्वी करण्याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर सविस्तर चर्चा झाली. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील, तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, जितेंद्र डाकी, भरत पाटील, रामनाथ पाटील, अजीज शेख, दीपक खाटेघरे, संदीप पवार आदींसह भाजपचे तालुक्यातील पदाधिकारी, मंडल अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे महा-जनसंपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी कपिल पाटील यांनी कार्यकर्त्यांबरोबर थेट संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली प्रत्येक योजना सामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करणारी आहे. गुजरातमध्ये टिफीन बैठकीचा प्रयोग यशस्वी झाला होता. प्रत्येक कार्यकर्त्याने घरच्या डब्याबरोबरच भोजन घेताना मनमोकळी चर्चा केली होती. चार डब्यांतील जेवणातून वेगवेगळी चव एकत्र येते. त्याच पद्धतीने विचारांची चव एकत्र येईल. त्यातून नवा भारत घडू शकेल, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.