मनाच्या एकाग्रतेसाठी योग साधना महत्त्वाची

मनाच्या एकाग्रतेसाठी योग साधना महत्त्वाची

Published on

कल्याण, ता. १८ (बातमीदार) : मनाच्या एकाग्रतेसाठी योग साधना करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागामार्फत पार पडलेल्या योग सप्ताहात ते बोलत होते.
दांडगे यांनी योगामुळे शरीर लवचिक व निरोगी राहण्यास मदत होते, तसेच योग साधनेमुळे मनही प्रफुल्लित राहते, असे सांगत सर्व उपस्थितांना त्यांनी योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपायुक्त अर्चना दिवे, उपायुक्त धैर्यशील जाधव, स्वाती देशपांडे, वंदना गुळवे, नगररचना विभागाच्या सहा. संचालक दिशा सावंत, महापालिका सचिव संजय जाधव, उपआयुक्त विनय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, नोडल अधिकारी तथा सहा. आयुक्त स्नेहा करपे आदी उपस्थित होते. क्रीडा व सांस्कृतिक विभागामार्फत १५ जून रोजी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महिला कर्मचाऱ्यांसाठी, तर १६ जून रोजी पुरुष कर्मचाऱ्यांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महिला कर्मचाऱ्यांना वीणा निमकर यांनी योगासनांचे प्रशिक्षण दिले आणि पुरुष कर्मचाऱ्यांना रवींद्र पाटील, राकेश मळेकर या योग शिक्षकांनी योगासनांचे प्रशिक्षण दिले. या योग प्रशिक्षणात प्रामुख्याने सूर्यनमस्कार, हलासन, मत्स्यासन, भुजंगासन, नौकासन, चक्रासन इ. आसनांची माहिती थेट प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थित कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
.....
विद्यार्थ्यांचाही सहभाग
योग प्रशिक्षण शिबिर, योग सप्ताहाच्या पुढील कालावधीत महापालिकेची विविध प्रभाग कार्यालये, महापालिका शाळा येथे होणार असून योग दिनानिमित्त सफाई कर्मचारी यांनाही विविध प्रभाग क्षेत्रांत योगासनांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच २१ जून रोजी योगदिन हा वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील बंदिस्त क्रीडागृहात महापालिका अधिकारी, कर्मचारी व महापालिका शाळांतील शालेय विद्यार्थ्यांसमवेत मोठ्या प्रमाणात होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.