भारतीय खाद्यपदार्थांचा दरवळ यंदा जगभरात पसरणार

भारतीय खाद्यपदार्थांचा दरवळ यंदा जगभरात पसरणार

Published on

भारतीय खाद्यपदार्थांचा दरवळ यंदा जगभरात पसरणार
गोदरेज फूड ट्रेंड २०२३ अहवाल
मुंबई, ता. १८ ः हे वर्ष भारतीय खाद्य पदार्थांचे असून त्यांचा साऱ्या जगात डंका वाजेल, असे गोदरेज फूड ट्रेंड्स २०२३ या सहाव्या अहवालात म्हटले आहे. वेगवेगळ्या भारतीय खाद्यपदार्थांविषयी जगभरात वाढलेला रस आणि भारतीय खाद्यपदार्थांची विविधता यामुळे भारतीय खाद्यपदार्थ जगातील साऱ्या खाद्य रसिकांच्या पसंतीस उतरतील, असेही यात म्हटले आहे.
गोदरेज इंडस्ट्रीच्या कार्यकारी संचालक तानिया दुभाष यांच्या उपस्थितीत या वर्षीचा गोदरेज फूड ट्रेंड रिपोर्ट नुकताच प्रकाशित करण्यात आला. या अहवालात देशातील विख्यात अशा साडेतीनशे मान्यवरांच्या मतांचा समावेश आहे. विशेषतः कोरोनानंतर भारतीय खाद्यपदार्थ हे आरोग्यदायक आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे असल्याचे आढळल्याने वेगवेगळ्या भारतीय रेसिपींची जगभरातील मागणीही वाढली असल्याचे या मान्यवरांनी म्हटले आहे. या सर्व मतप्रदर्शनांच्या साह्याने हे वर्ष भारतीय खाद्यपदार्थांचे असेल, असा निष्कर्ष या अहवालात आहे.
कोरोनानंतर जगभरातीलच खवय्यांच्या खाद्यसवयी आणि त्यांचे पसंतीक्रमही बदलले आहेत. हे सर्व वेगवेगळे कल गोदरेज फूड ट्रेंड रिपोर्टमध्ये खाद्यपदार्थ उद्योगाच्या फायद्यासाठी मांडण्यात आले आहेत. गेली अनेक वर्षे या अहवालात तज्ज्ञांनी मांडलेली मते तंतोतंत खरी ठरतात, असेही दिसून आले आहे. या वर्षी भारतीय खाद्यपदार्थांना जगात मागणी येईल, ही गोष्ट अत्यंत उत्साहवर्धक आहे, असे तानिया दुभाष म्हणाल्या.

सध्याच्या खाद्यपदार्थांच्या ट्रेंडवर चर्चा व्हावी आणि फूड इंडस्ट्रीच्या तज्ज्ञांना एकमेकांच्या कल्पनांची देवाण-घेवाण करता यावी हा गेली सहा वर्षे अहवाल प्रसिद्ध करण्यामागे आमचा हेतू होता व तो साध्य झाला.
- सुजित पाटील, उपाध्यक्ष, गोदरेज इंडस्ट्रीज (कॉर्पोरेट ब्रँड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.