सोशल मीडियावर‘बापमाणुस’चा दबदबा

सोशल मीडियावर‘बापमाणुस’चा दबदबा

Published on

जुईनगर, ता. १८ (बातमीदार)ः वडील म्हटलं की कठोर शब्द, रागीट चेहरा, सतत अभ्यास करायला सांगणारे, मुलांपेक्षा मुलींवर अतोनात प्रेम करणारा चेहरा सर्वांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. आईवरील प्रेम चटकन व्यक्त होते; मात्र वडिलांवरील प्रेम व्यक्त करण्याला वेळ जात असल्याने मुलांच्या आयुष्यातील वडिलांचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे सांगण्यासाठी सोशल मीडियावर ‘फादर्स डे’ साजरा केला गेला.
आईवर असलेले प्रेम नेहमीच कोणत्या ना कोणत्या मार्गाने व्यक्त केले जाते; मात्र आयुष्यभर कुटुंबासाठी मेहनत करणारा बाप नेहमी पडद्याआडच असतो. अशा आपल्या जन्मदात्याविषयी व्यक्त होण्यासाठी अमेरिकेतील सोनोरा स्मार्ट दोड या महिलेने ‘फादर्स डे’ची सुरुवात केली. मदर्स डेप्रमाणेच वडिलांविषयी आदर, प्रेम व्यक्त करणे, हा यामागचा हेतू होता. तेव्हापासून १८ जून रोजी फादर्स डे उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे सोशल मीडियादेखील यात मागे राहिलेला नाही. सोशल मीडियावरील विविध मेसेज, पोस्ट्‌स, फोटोजमधून जुन्या आठवणींना उजाळा देत वडिलांबद्दलचे प्रेम अनेकांनी व्यक्त केलेले पाहायला मिळत आहे. अनेक चिमुरड्यांनी इवल्याशा हातांनी घरच्या घरी गिफ्ट तयार करून वडिलांना भेट दिल्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले. त्यामुळे वडिलांविषयी प्रेम व्यक्त करण्याच्या भन्नाट कल्पनांचा पाऊसच जणू सोशल मीडियावर पाहायला मिळाला.
--------------------------------------------------
शुभेच्छांचा अक्षरशः धुमाकूळ
व्हाट्सॲप, ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून स्वतःच्या मनात वडिलांविषयी असलेले प्रेम, आदर चारोळीच्या माध्यमातून अनेकांनी व्यक्त केले; तर अनेकांनी ट्विटरवरून # बापमाणुस, # फादर्स डे, #जन्मदाता, #माझं जग, #डॅडी असे विविध प्रकारचे हॅशटॅग वापरून प्रचंड मेसेजेस, फोटो, व्हायरल केल्याने सोशल मीडियावर शुभेच्छांचा अक्षरशः धुमाकूळ पाहायला मिळाला.
----------------------------------------------------
बाप म्हणजे कोण असतं?
हरवलेल्या पाखराचं छत्र
अन् बिथरलेल्या आवाजाचं
पत्रं असतं..!!
---------------------------------
पिता धर्मः पिता स्वर्गः पिता हि परमं तपः।
पितरि प्रीतिमापन्ने प्रीयन्ते सर्वदेवताः॥
पितरौ यस्य तृप्यन्ति सेवया च गुणेन च।
तस्य भागीरथीस्नानमहन्यहनि वर्तते॥"
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
-----------------------------------
त्यांचे आदर्श त्यांचे संस्कार
वडिलांशिवाय जीवन आहे लाचार..!
हॅपी फादर्स डे
----------------------------------
ध्येय दूर आणि प्रवास फार आहे
लहानसे आयुष्य आणि काळजी फार आहे
जगणं कठीण होऊन जातं एका क्षणी
परंतु वडिलांचे पाठीशी उभे राहणे
यातच संपूर्ण यश आहे.
हॅप्पी फादर्स डे पप्पा
----------------------------------- -
दिसतो स्वर्ग आपणाला
स्वतः मेल्यावरती…
अन् बापाचा संघर्ष कळतो
स्वतः बाप झाल्यावरती..!!
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
-----------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.