वऱ्हाडी मोर्चाला न्याय मिळणार?

वऱ्हाडी मोर्चाला न्याय मिळणार?

खर्डी, ता. १८ (बातमीदार) : रोजंदारी व तासिका कर्मचाऱ्यांचे सोमवारी आदेश काढण्यात येईल, असे आश्वासन आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी
शासकीय निवासस्थानी वऱ्हाडी मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत शुक्रवारी रात्री झालेल्या चर्चेत दिले होते. परंतु मोर्चेकरांनी लेखी आदेश मिळाल्याशिवाय मोर्चाला स्थगिती देणार नसल्याचे ठामपणे सांगितले. त्यामुळे हा मोर्चा सोमवारपर्यंत शहापूर येथील गंगा देवस्थान येथेच राहणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मोर्चेकरांच्या अडचणींबाबत चर्चा केली. त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार शांताराम मोरे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, सामाजिक कार्यकर्ते अनिल घोडविंदे, मोर्चाच्या रुपाली कांडोळेळ, ललीतकुमार चौधरी, योगिता पवार व अतुल गुरव आदी उपस्थित होते. मोर्चेकरांच्या मागण्या रास्त आहेत. दोन दिवस सुट्टीचे आल्याने सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून योग्य तो न्याय मिळणार असल्याचे शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांनी सांगितले. या मोर्चाला शहापूरचे आमदार दौलत दरोडा, प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष वसंत पानसरे, काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष महेश धानके व सिटू संघटनासहत अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, शिष्टमंडळांनी लेखी आदेश मिळाल्याशिवाय मोर्चाला स्थगिती देणार नसल्याचे सांगितले.


आदिवासी विकासमंत्री विजय कुमार गावित यांनी आमच्या मागण्या पूर्ण करू, असे तोंडी आश्वासन दिले आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्याशी चर्चा करून लेखी आदेश दिल्यावरच मोर्चाला स्थगिती देऊ. तोपर्यंत आम्ही मुंबईकडे वाटचाल करत राहणार आहोत.
- रूपाली कोंडोळे, मोर्चाच्या नेत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com