टेलिग्राम अकाउंटवरून नऊ लाखांची फसवणूक

टेलिग्राम अकाउंटवरून नऊ लाखांची फसवणूक

Published on

नवीन पनवेल, ता. १८ (वार्ताहर) : टेलिग्रामवरून संभाषण करणाऱ्या एका महिला व पुरुषाने नऊ लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रचना हाईट सोसायटी येथील तन्वी मांढरे यांनी नोकरी मिळवण्यासाठी वेबसाईटवर बायोडाटा भरला होता. त्यांना टेलिग्राम अकाऊंटवर अश्विनी नावाच्या महिलेने पार्ट टाइम, फुल टाइम नोकरी उपलब्ध असून चांगला पगार व बोनस मिळेल, असा इंग्लिशमध्ये मेसेज पाठवला. त्याच दिवशी श्रेया गुप्ता या महिलेच्या टेलिग्राम अकाऊंटवरून ऑनलाईन नोकरीची ऑफर आली. त्यानंतर गुप्ता हिने तन्वी यांना हॉटेलला रेटिंग व रिव्ह्यूज करण्यासाठी लिंक पाठवली. लिंकवर तन्वी यांनी माहिती भरली. टास्क पूर्ण केल्यानंतर तन्वी यांनी अकरा हजार रुपये पाठवल्यावर त्यांच्या खात्यात १६ हजार रुपये जमा झाले. रेटिंग केल्याचा मोबदला रक्कम मिळत असल्याने तन्वी यांचा विश्वास बसला व त्यांनी टार्गेटप्रमाणे वेगवेगळ्या हॉटेल्स रेटिंग देण्याचे काम केले व रक्कम भरल्यानंतर कामाचा मोबदला म्हणून २२ लाख ८२ हजार ५०० एवढी रक्कम मिळणार असल्याने त्यांनी नऊ लाख ७१ हजार ३५६ एवढी रक्कम टेलिग्राम अकाऊंटवर मेसेज पाठवलेल्या बँक खात्यावर भरले. रक्कम भरल्यानंतर पुन्हा नऊ लाख ३४ भरावे लागतील, असे दिसून आले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार दाखल केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.