उल्हासनगरमधील रिक्षाचालकाच्‍या मुलाची गेट मध्ये बाजी

उल्हासनगरमधील रिक्षाचालकाच्‍या मुलाची गेट मध्ये बाजी

Published on

उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) ः देशपातळीवर पार पडलेल्या गेटच्या परीक्षेत उल्हासनगरातील रिक्षाचालकाच्या मुलाने बाजी मारली आहे. पुढील एम.टेक. शिक्षणासाठी त्याची आसाममधील गुवाहाटी मध्ये निवड झाली असून तो २१ जुलै रोजी रवाना होणार आहे. राहुल दिंगबर हजारे असे या युवकाचे नाव असून आजच्‍या तरुण पिढीसाठी त्‍याने एक आदर्श ठेवला आहे.
वडील दिगंबर हजारे हे गेल्या ३५ वर्षांपासून रिक्षा चालवत आहेत. तसेच ते शहीद मारोतीराव जाधव रिक्षा युनियनचे सरचिटणीस आहेत. परिस्थिती बेताची असल्याने हजारे यांनी राहुलला तक्षशिला विद्यालयात इयत्ता १० वी पर्यंत शिकवले. पुढे राहुलने न्यू इंग्लिश शाळेत १२ वी पर्यंत शिक्षण घेतल्यावर पुण्यामध्ये इंजिनिअरिंग केले.
पुढे त्याने देशपातळीवर होणाऱ्या गेट परीक्षेत भाग घेण्याचा निर्णय घेतला. दिगंबर हजारे आणि त्यांची पत्नी आम्रपाली यांना राहुलची इच्छाशक्ती प्रबळ वाटली. त्यांनी त्याला पाठबळ देताना घरातील सर्व सोन्याचे दागिने गहाण ठेवले. राहुलला आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव होती. त्याने अभ्यासात स्वतःला झोकून दिले आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याने गेटची परीक्षा दिली. एप्रिलमध्ये परीक्षेचा निकाल लागला असून ४१४ गुण मिळवून राहुल उत्तीर्ण झाला आहे. राहुलची नुकतीच एम.टेक. या पुढील शिक्षणासाठी आसाममधील गुवाहाटी येथे निवड झाली असून २१ जुलै रोजी तो रवाना होणार आहे.
...............................................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.