कृषीदिनानिमित्त प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

कृषीदिनानिमित्त प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

पालघर, ता.३ (बातमीदार) ः कृषी विभाग जिल्हा परिषद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पालघर तसेच पंचायत समिती पालघर यांच्या संयुक्त विद्यमानाने पालघर येथे कृषिदिनाचे आयोजन करण्यात आले होते. यामवेळी जिल्ह्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, उपाध्यक्ष पंकज कोरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे, बांधकाम व आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे आणि कृषी समिती सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, भाजीपाला लागवड फळबाग, प्रगतिशील शेतकरी, प्रयोगशील शेतकरी, बायोगॅस बांधकाम या योजना राबवणाऱ्या जिल्ह्यातील एकूण ५० शेतकऱ्यांचा या वेळी गौरव करण्यात आला. यामध्ये वाडा तालुक्यातील ६, मोखाडा ५, विक्रमगड ५, पालघरमधील १३, जव्हार ५, डहाणू ६; तर वसईतील ५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अशी शेती केली पाहिजे की आपण जिल्ह्याचे रोल मॉडेल झाले पाहिजेत. तशी बाजारपेठदेखील शेतकऱ्यांना उपलब्ध व्हायला हवी, असे सांगून जिल्हा नियोजनमधून शेतकऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण योजना राबवण्यासाठी पाठपुरावा करू, असे जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी आश्वासित केले.

........................
बोळिंज जिल्हा परिषद शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्‍त बालनाट्य
वसई (बातमीदार) ः विरार बोळिंज येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त बालनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. गुरुपौर्णिमेचे महत्त्व आणि जीवनात गुरूंचे स्थान, आदर राखण्याचे संस्कार या बालनाट्यातून प्रतीत झाले. या वेळी विद्यार्थ्यांना प्रेक्षकांनी प्रोत्साहित केले. या बालनाट्याचे लेखन, दिग्दर्शन भालचंद्र वझे, नाट्य विस्तार भालचंद्र पाटील, पार्श्वगायन सौरभ म्हात्रे व मनीषा पाटील, पार्श्वसंगीत स्मित रॉड्रिग्ज यांनी केले.
--------------------
वसईत बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव
वसई (बातमीदार) ः तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वसई विधानसभेच्या वतीने २०२३ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयेाजन करण्यात आले होते. वसई विधानसभा संघटक विनायक निकम यांनी हे आयोजन केले होते. वसई, आगाशी, निर्मळ, कळंब, नालासोपारा, विरार या सर्व भागांतून सुमारे २०० विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, वसई विधानसभा संपर्कप्रमुख जगदीश कदम, उपजिल्हाप्रमुख जनार्दन म्हात्रे, जिल्हा संघटक किरण चेंदवणकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, प्रशस्तिपत्रक, लेखन साहित्य देण्यात आले.
...............................
वालीव विठ्ठल मंदिर येथील मिनाधनगर चौकाचे उद्‍घाटन
विरार (बातमीदार) ः वसई-विरार महापालिकेने येथील क्षेत्रातील नाके, चौक सुशोभित करून विविध प्रकारचे पुतळे बसवून शहराचा कायापालट करण्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात वेगळीच भर पडली आहे. अशाच प्रकारे वालीव विठ्ठल मंदिरासमोर वारकऱ्यांचे वीणा, पखवाज, टाळ व डोक्यावर तुळसीवृंदावन घेतलेली महिला असे पुतळे उभारले असून त्याचे आषाढी एकादशीचे औचित्य साधून उद्‍घाटन करण्यात आले. या चौकाला मीना कांती धनगर असे नाव देण्यात आले आहे. या वेळी वालीव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलाश बर्वे, वालीवचे माजी सरपंच हरेश्वर भगत, माजी उपसरपंच कांतिशेठ धनगर, ग्रामपंचायतचे माजी सदस्य अरुण पाटील, ज्‍येष्ठ नागरिक कमलाकर भोईर, हिराशेठ पाटील, वालीव बविआचे युवा अध्यक्ष महेश धनगर, समाजसेवक जगदीश भोईर, राजा माहिते, रणधीर कांबळे, भावेश पाटील, कैलाश पायगावकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com