मद्यापी पर्यटकांवर पोलीसांची करडी नजर

मद्यापी पर्यटकांवर पोलीसांची करडी नजर

Published on

वाशी, ता.३ (बातमीदार) : पावसाळी दिवसांमध्ये निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी होतांना दिसत आहे. नवी मुंबईतील घणसोलीमधील गवळी देव धबधबा, सुलाई देवी येथील निसर्गरम्य ठिकाणी व इलठण पाडा येथील ब्रिटीशकालीन धरण येथे निर्सगाच्या सानिध्यात मौज करण्यासाठी पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात होऊ लागली आहे.

गवळीदेव डोंगर व इलठण पाडा येथील ब्रिटीश कालनी धरण परिसरात पर्यटनांचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये काही अतिउत्साही पर्यटकही असतात त्याच्यांकडून करण्यात येणाऱ्या अतिउत्साही प्रकारांना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने स्थानिक पोलिसांनाही सध्या विशेष खबरदारी घेण्यासा सुरुवात केली आहे. पर्यटकांना सावध करण्यासाठी रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गवळीदेव धबधब्याच्या प्रवेशद्वाराशेजारी पर्यटकांसाठी मार्गदर्शक सुचना असलेला फलक लावण्यात येणार आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रबाळे एमआयडीसी पोलिसांकडून लावण्यात आलेल्या या सुचना फलकांमध्ये पर्यटकांसाठी काही सुचना देखील करण्यात येणार आहे. पर्यटकांनी वाहतुक कोंडीची समस्या उद्भवू नये, यासाठी व्यवस्थित वाहने पार्क करावी. पर्यटनांच्या ठिकाणी मद्याप्राशन केल्यास त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी काढताना कोणतीही दुर्घटना घडणार नाही यांची दक्षता घ्यावी. असे आवाहन पोलिसांच्यावतीने पर्यटकांना करण्यात आले आहे. इलठण पाडा येथील ब्रिटिशकालीन असणाऱ्या धरणामध्ये उतरण्यास सक्त मनाई असून सुट्टीच्या दिवशी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे.


--
गवळी देव, सुलाई देवी डोंगर परिसर व इलठण पाडा येथील ब्रिटीशकालीन धरण या ठिकाणी उघड्यावर मद्याप्राशन केल्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन अशा मद्यापीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पर्यटनस्थळी सुचना फलक लावण्यात येणार आहे. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी कडक पहारा देखील ठेवण्यात येत आहे. तसेच ज्यांच्या मालकीची जागा आहे. त्यांनी देखील त्या ठिकाणी काळजी घ्यावी.
- संजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, रबाळे एमआयडीसी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.