नॅशनल इंग्लिश स्कूल विरार मध्ये लोकशाहीचा उत्सव

नॅशनल इंग्लिश स्कूल विरार मध्ये लोकशाहीचा उत्सव

विरार, ता. ३ (बातमीदार)ः विरारच्या नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचालित शाळेमध्ये विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्त्‍व पटण्यासाठी दरवर्षी प्रत्येक वर्गातील मॉनिटर- मानिटरेस निवडण्यासाठी आगळ्या वेगळ्या पद्धतीने निवडणूक घेतली जाते.
या शाळेमध्ये निवडणुकीची आचारसंहिता विद्यार्थ्यांना सांगितली जाते. ज्यामध्ये उमेदवाराला विरोधी उमेदवाराचा अपप्रचार करता येत नाही व त्याने प्रचारासाठी बनवलेल्या पोस्टरवर फक्त सकारात्मक गोष्टी लिहिता येतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तेढ किंवा वैमनस्य रुजत नाही. प्रत्येक उमेदवाराला भाषण करण्याची एक संधी दिली जाते व सर्व विद्यार्थ्यांना मतपत्रिका देऊन बॅलेट वॉक्समध्ये शिस्तबद्ध पद्धतीने मतदान करता येते. जिंकून आलेल्या विद्यार्थ्यांना यथोचित सल्ले देऊन पुढचे कार्य करण्यासाठी मार्गदर्शन दिले जाते. असे मॉनिटर, मॉनिटरेस प्रत्येक आठवड्यामध्ये वर्गाचा अहवाल विहित नमुन्यात मुख्याध्यापकांना सादर करतात व मुख्याध्यापकांच्या समोर आपले मुद्दे मांडून त्याचे निराकरण कसे होईल याचा विचारविनिमय करतात. या सगळ्या प्रक्रियेचे सादरीकरण या विद्यार्थ्यांनी इंग्लडमधील टीवशेल्फ कम्युनिटी स्कूल शाळेमध्ये केले होते. या सादरीकरणाला सदरील शाळेच्या कार्मचारी वर्गाकडून व विद्यार्थ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. हा उपक्रम त्या शाळेमध्ये कार्यान्वित केला जाईल, असे त्यांनी नमूद केले होते. या उपक्रमामुळे नागरिकशास्त्राची जाण मुलांना होतेच, पण त्याचबरोबर संभाषणकला, वकृत्व, समस्या हाताळण्याची हातोटी अशा विविध उपयुक्त गुणांना चालना मिळते, असे शाळेतर्फे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com