नवनिर्मितीतून शहर विकासाला गती

नवनिर्मितीतून शहर विकासाला गती

Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३ : नागरिकांच्या नाविन्यपूर्णतेला वाव देत व तशा प्रकारच्या संकल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी प्रकल्प निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देऊन शहर विकासाला गतीमानता देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन इनोव्हेशन प्रोग्राम’ प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. ग्रोक लर्निंग प्रा. लि. यांचे सहयोगाने राबविला जाणा-या या अभिनव उपक्रमात डॉ. डी. वाय. पाटील इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर सहकार्याची भूमिका बजावित आहे. नुकतीच याबाबतची प्रशिक्षण कार्यशाळा डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ सभागृहात संपन्न झाली.

पालिकेमार्फत यापूर्वी प्रत्येक वर्षी ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी चॅलेंज’ आयोजित केले जात असून त्याला उत्तम प्रतिसाद लाभला आहे. त्याचेच पुढचे व ठोस पाऊल या ‘मिशन इनोव्हेशन प्रोग्राम’ अंतर्गत टाकले जात आहे. याव्दारे नवनिर्मितीच्या संकल्पना राबविणारे इनोव्हेटर्स, इनक्युबेटर व या संकल्पनांची अंमलबजावणी करणारे इम्प्लिमेंटर्स यांना एकाच व्यासपीठावर आणले जात आहे. याव्दारे नवी मुंबईतील विद्यार्थी, युवक, तरूण व्यावसायिक, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक हे एकत्र येऊन शहर उपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार आहेत. नाविन्यपूर्णतेचे फायदे नवी मुंबईतील कानाकोप-यात पोहचतील याची खात्री करून घेऊन संपूर्ण नवी मुंबई शहरात यशस्वी व अभिनव प्रकल्पांची अंमलबजावणी सोयीची करण्याकरिता नवी मुंबई महापालिका महत्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.