जुन्या टॉवरच्या आत नवीन टॉवर!

जुन्या टॉवरच्या आत नवीन टॉवर!

Published on

मुंबई, ता. ३ ः मुंबईसारख्या महानगरात जमिनीचा मोबदला आणि संपादनाशी संबंधित मोठ्या किमतीमुळे विद्यमान ट्रान्समिशन लाईन टॉवर बदलणे कठीण आहे. बहुतेक वेळा नुकसानभरपाई आणि जमिनीशी संबंधित इतर समस्यांमुळे अशा प्रकल्पांना विलंब होत असतो. त्या पार्श्वभूमीवर टाटा पॉवर कंपनीने नावीन्यपूर्ण अशी ‘टॉवरच्या आत टॉवर’ संकल्पना राबवली आहे. त्या अनुषंगाने जुने ११० केव्ही पॉवर ट्रान्समिशन टॉवर्स बदलून नवीन अरुंद टॉवर उभारत एक नावीन्यपूर्ण पर्यायी मार्ग शोधला आहे. मुंबईत ११० केव्हीच्या वाहिनीसाठी प्रथमच अशा स्वरूपाची संकल्पना राबवण्यात येत आहे.

टाटा पॉवरच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘टॉवरच्या आत टॉवर’ या नावीन्यपूर्ण प्रक्रियेमध्ये जुना टॉवर पूर्णपणे काढून टाकावा लागत नाही. जुन्या टॉवरच्या आतल्या छोट्या जागेत नवीन टॉवर उभारता येतो. या उपक्रमामुळे पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत टॉवर बांधणीच्या ३० टक्के वेळेची बचत होते. हे नवीन टॉवर बांधण्यासाठी एका महिन्यापेक्षा कमी कालावधी लागणार आहे.

टाटा पॉवर कंपनीचे ११० केव्हीचे एकूण तीन हजार ट्रान्समिशन टॉवर आहेत. फक्त जुन्या झालेल्या टॉवरच्या आतील भागी नवीन अरुंद टॉवर उभारले जाणार आहेत. टाटा पॉवर कंपनीने कल्याणमध्ये असे चार नवीन टॉवर उभारले आहेत. दिवा आणि मुंब्रा भागातील ट्रान्समिशन कॉरिडॉरवर अशा प्रकारचे आणखी टॉवर उभारले जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.