वाहन उभे करण्यावरून आई, मुलाला मारहाण

वाहन उभे करण्यावरून आई, मुलाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : वाहन उभे करण्यावरून आई व मुलाला तीन जणांनी मारहाण केल्याची घटना रविवारी (ता. २) रात्री घडली आहे. कल्याण-शीळ मार्गावरील पलावा वसाहतीत व्हीएनतो इमारतीजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शरद मणारी यांच्या तक्रारीवरून सागर पाटील, अरविंद पाटील आणि एक अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार शरद मनारी राहत असलेल्या इमारतीच्या तळमजल्याला त्यांनी आपले वाहन उभे केले होते. त्या वाहनाच्या पाठीमागे आरोपी सागर पाटील याने वाहन उभे केले होते. त्यामुळे शरद यांना वाहन बाहेर काढताना अडथळा निर्माण झाला. शरद यांनी सागरला वाहन असे उभे का केले आहे अशी विचारणा केली. त्याचा राग सागरला आल्यानंतर त्याने व त्याचा भाऊ अरविंद व अन्य एकाने शरद यांना बेदम मारहाण केली. हा वाद सुरू असताना शरद यांची आई मध्यस्थी करण्यासाठी आली. त्या वेळी तिघांनी आईलाही जमिनीवर पाडून मारहाण केली. शरद यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सागर आणि त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com