महामार्गावर अतिक्रमण करणाऱ्यांवर होणार कारवाई

महामार्गावर अतिक्रमण करणाऱ्यांवर होणार कारवाई

पालघर, ता. ६ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी अनधिकृत भराव केलेल्या तसेच भराव टाकून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबवलेल्या व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा अधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष गोविंद बोडके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबई-अहमदाबाद मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने व पुराच्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे जिल्हा अधिकारी गोविंद बोडके यांनी वसई-विरार महानगर प्रशासन, भारतीय राष्ट्रीय महामार्ग, महामार्ग पोलिस यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली होती. या वेळी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी अनधिकृत भराव केलेल्या तसेच भराव टाकून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबवलेल्या व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायदानुसार संयुक्तरीत्या कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच महामार्गावर जागोजागी रिफ्लेक्टर लावणे, महामार्गावरील डिव्हायडरमधील झाडांच्या बाहेर आलेल्या फांद्यांची कटिंग करून घेणे, तसेच सदर बैठकीत महामार्गावरील खड्डे तात्काळ भरून काढण्यात यावेत. तसेच नैसर्गिक आपत्तीसमयी राज्य शासनाच्या मशनरी यांच्यावर वनविभागाने कार्यवाही करू नये, याबाबत ही सूचना या वेळी जिल्हाधिकारी यांनी केल्या. तसेच महानगरपालिका प्रशासनाने महामार्गावर दोन पोकलेन आणि तीन जेसीबी पावसाळ्याच्या कालावधीकरिता ठेवण्यात आल्याचे वसई-विरार शहर मनपाचे उपायुक्त किशोर गवस यांनी सांगितले. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भांगरे, प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, पोलिस अधीक्षक ठाणे डॉ. मोहन दहिकर, उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक हेमचंद्र कोळेकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com