छेड काढणाऱ्या तरुणाला रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

छेड काढणाऱ्या तरुणाला रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ : विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकावर एक महिला पतीसह उभी होती. पती पाण्याची बाटली आणायला गेला, तेवढ्यात एक तरुण महिलेजवळ आला आणि त्याने तिला ‘तू मला ब्लॉक का केले’ असे विचारले. तेवढ्यात महिलेचा पती तिथे आला आणि दोघांमध्ये जोरदार राडा झाला. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या घटनेची त्वरित दखल घेत महिलेची छेड काढणारा आणि तिच्या पतीसोबत हाणामारी करणारा तरुण रोहित गायकवाड याला अटक केली आहे.
उल्हासनगरमध्ये राहणारी एक महिला तिच्या पतीसोबत डोंबिवलीला जाण्यासाठी विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकात पाोहचली. तेव्हा या महिलेचा पती पाण्याची बाटली घेण्याकरीता कॅन्टीनकडे गेला. याचवेळी एक तरुण महिलेच्या जवळ आला. त्याने ‘तू मला ब्लॉक का केले’ अशी महिलेला विचारणा केली. याचदरम्यान तिचा पती तिथे आला आणि पतीने त्याला जाब विचारला. यातून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. नागरिकांनी त्यांची हाणामारी सोडविली. या प्रकरणी विठ्ठलवाडी स्टेशनवर असलेल्या पोलिसांच्या मदतीने रोहित गायकवाड या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
कल्याण जीआरपी पोलिसांनी रोहित गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.