शिंदे-फडणवीस दिलेला शब्द पाळतात

शिंदे-फडणवीस दिलेला शब्द पाळतात

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आमच्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधींचे स्थान कोणत्याही ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निश्चित करतील. आमचे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री यांच्यासोबत २७ वर्षे; तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत १५ वर्षांपासून काम करत आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते लोकप्रतिनिधींना दिलेले शब्द पाळतात अशी त्यांची ख्याती आहे, असे मत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले.
गुरुवारी समतानगर आणि लोकमान्यनगर येथील चाळींमधील लोकांच्या पुनर्वसनाबाबत ठाणे महापालिका मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी प्रसारमध्यामंशी बोलताना आमदार सरनाईक यांनी मत व्यक्त केले. आज राजकीय समीकरण बदलले असून सत्तेत वाटेकरी वाढले आहेत. भविष्यात राजकीय समीकरण जे महाराष्ट्राचे आहे, त्यामध्ये सगळ्यांना सामावून घेऊन राज्यातील सर्वसामान्य जनेतची कामे करण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील आगामी निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लढणार असल्याचे स्पष्ट केले. अजित पवार यांच्या प्रवेशानंतर शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असल्याची चर्चा आहे; मात्र यामध्ये कोणत्याच प्रकारचे तथ्य नसल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

------------------
ठाकरे गटाचे काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात
शिंदे गटाचे आठ ते दहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य विनायक राऊत यांनी केले होते; मात्र या केवळ वावड्या असून ठाकरे गटाचेच काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून लवकरच स्फोट होईल, असा दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. भविष्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रावादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.